नंदुरबार ग्रंथोत्सव – २०२५ ला आजपासून शहरात सुरुवात झाली. आज सकाळी ग्रंथदिंडी काढण्यात आली, यामध्ये शालेय विद्यार्थिनींनी ग्रंथ, साहित्य आणि मान्यवरांचं औक्षण केलं.
या वेळी जेष्ठ साहित्यिक निबींजीराव बागुल, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय महासंघाचे कोषाध्यक्ष प्रविण पाटील, आदी मान्यवरांसह शिक्षक आणि विद्यार्थी मोठया संख्येनं उपस्थित होते, अशी माहिती आमच्या बातमीदारानं दिली.