नांदेड जिल्ह्यातल्या नांदेड शहर आणि परिसरात तसंच अर्धापूर, हदगाव या तालुक्यात आज सकाळी ६ वाजून ५२ मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ३ पूर्णांक ८ दशांश रिक्टर स्केल इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू नांदेड शहरापासून २९ किमी दूर उत्तरपूर्व दिशेला हदगाव तालुक्यातल्या सावरगाव या गावात असून या धक्क्यामुळे कुठलीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलं आहे.
Site Admin | October 22, 2024 4:48 PM | Earthquakes | Nanded
नांदेड जिल्ह्यातल्या काही भागात भूकंपाचे सौम्य धक्के
