नांदेड मध्ये पाटबंधारे नगर भागात ६ एप्रिल २००६ रोजी झालेल्या स्फोट प्रकरणी नांदेड जिल्हा सत्र न्यायालयानं १२ जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. या स्फोटात दोन जण ठार झाले होते. या प्रकरणाच्या पोलीस तपासात वेगवेगळ्या बाबी पुढे आल्या होत्या. त्यानंतर तो सीबीआय कडे सोपवण्यात आल्यानंतर सी बी आयनं सखोल तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं होतं. या खटल्याच्या सुनावणीत ४० साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली, मात्र सीबीआय, हा स्फोट बॉम्बस्फोट असल्याचं सिद्ध करू शकली नाही.
Site Admin | January 5, 2025 7:20 PM | Nanded