मागच्या दोन वर्षांत महाराष्ट्राची इतर राज्यांच्या तुलनेत पिछेहाट झाली असून सरकारने वार्ताहर परिषदेत केलेले सर्व दावे खोटे असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. राज्यात होऊ घातलेले प्रकल्प गुजरात आणि इतर राज्यात गेले, राज्यात बेरोजगारी वाढली, मुंबईतल्या मोक्याच्या जागेवरल्या जमिनी उद्योगपतींना देण्यात आल्या, कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली असा आरोप नाना पटोले यांनी केला. राज्यावर ९ लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे, असंही पटोले म्हणाले.
Site Admin | October 16, 2024 6:30 PM | Congress | Nana Patole