भाजपा युती सरकारच्या काळात दलितांवर सातत्यानं अत्याचार होत असून त्यांना न्याय मिळत नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. विधानसभेत परभणी आणि बीड जिल्ह्यातल्या घटनांवरच्या चर्चेत ते बोलत होते. परभणीत पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करुन निरपराध लोकांवर लाठीचार्ज केला, त्यांना लाठीचार्जचे आदेश कुणी दिले? सोमनाथ सुर्यवंशी हा पोलीस लाठीचार्जचा व्हीडिओ शूट करत असताना पोलिसांनी त्याला अटक केली आणि पोलीस कोठडीत बेदम मारहाण केली, त्यात त्याचा मृत्यू झाला. पण सरकारनं अद्याप एकाही पोलिसावर कारवाई का केली नाही, असा प्रश्न पटोले यांनी केला.
Site Admin | December 19, 2024 7:47 PM | Vidhansabha Session