महायुती सरकारने लाडक्या बहिण योजनेद्वारे महिलांना पंधराशे रुपये दिले असले तरी गेल्या २ महिन्यात महागाईत वाढ झाली असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. महायुतीने काँग्रेसच्या विरोधात प्रसारित केलेल्या व्हिडीओला उत्तर देताना ते बोलत होते. महाराष्ट्रात लहान मुलीवर अत्याचार होत असून राज्यात महिला मुली सुरक्षित नाहीत, त्यामुळे राज्यातल्या महिला महाविकास आघाडी सोबत असल्याचा दावा पटोले यांनी केला.
Site Admin | October 29, 2024 7:17 PM | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले