राष्ट्रीय नागरी भूस्थानिक आधारित जमीन सर्वेक्षण अर्थात ‘नक्शा’ या उपक्रमाचं उद्घाटन आज ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते होणार आहे. याअंतर्गत २६ राज्यांमधल्या नागरी भागात भूसर्वेक्षण केलं जाणार आहे. शहरी भागात जमिनीच्या मालकीचे अचूक आणि विश्वासार्ह तपशील तयार व्हावेत यासाठी जमीन नोंदणी करणं आणि माहिती अद्ययावत करण्याचं काम केलं जाईल. माहिती तंत्रज्ञानावर आधारित या यंत्रणेमुळे पारदर्शकता, कार्यक्षमता वाढेल आणि शाश्वत विकासालाही त्याचा हातभार लागेल असं ग्रामविकास मंत्रालयानं नमूद केलं आहे. महाराष्ट्रातल्या १० स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हे सर्वेक्षण होणार असून, त्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कन्नड, तसंच बुलडाणा नगर परिषद क्षेत्राचा समावेश आहे.
Site Admin | February 18, 2025 1:13 PM | Land Survey | NAKSHA
‘नक्शा’ उपक्रमाचं ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते उद्घाटन होणार
