नागपुरमधे सोमवारी झालेल्या हिंसाचारात सहभागी असलेल्यांना शोधण्यासाठी पोलिसांनी १८ विशेष पथकं तयार केली असून आतापर्यंत ६९ जणांवर गुन्हे दाखल केल्याचं नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ रवींद्र कुमार सिंगल यांनी सांगितलं आहे. ते काल वार्ताहरांशी बोलत होते.
दंगलींच्या ठिकाणच्या सीसीटीव्ही चित्रफिती तपासल्यावर पोलिसांनी २०० संशयितांची यादी तयार केली असून त्यांची नावं सोमवारी दाखल केलेल्या प्राथमिक माहिती अहवालात नोंदवली आहेत. चित्रफितीत आढळलेल्या इतर एक हजार संशयितांची ओळख पटवण्याचं काम सायबर सेलच्या मदतीने सुरु असल्याचं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.