आज जागतिक कर्करोग विरोधी दिन आहे. युनायटेड बाय युनिक अशी या दिनाची संकलंपना असून कर्करोगाला प्रतिबंध, त्याचं निदान आणि उपचार याबाबत जनजागृती करण्यासाठी हा दिवस पाळला जातो.
जागतिक कर्करोग दिनानिमित्त नागपूर इथल्या राष्ट्रसंत तुकडोजी कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्राच्यावतीनं आज जनजागृती फेरी काढण्यात आली. यावेळी विविध घोषवाक्य तसंच पथनाट्यांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. या फेरीत विविध आरोग्य महाविद्यालयातले डॉक्टर, परिचारिका यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते.