डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

नागपूर हे शांततेचं प्रतीक – माणिकराव ठाकरे

देशाच्या मध्यभागी असलेलं नागपूर हे शांततेचं प्रतीक आहे, इथं कधीही दंगली झाल्या नाहीत. हिंदू-मुस्लिम समाजाचं अतूट प्रेमाचं नातं या शहरात आहे. हे नातं तोडण्याचे प्रयत्न यशस्वी होऊ देता कामा नये, असं आवाहन काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी आज नागपूर इथं केलं.

 

काँग्रेस सत्यशोधन समितीनं नागपूर हिंसाचार प्रकरणाचा आढावा घेतल्यानंतर आयोजित वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाला असा मोर्चा काढण्याची परवानगी का दिली आणि त्या मोर्चात झालेल्या आक्षेपार्ह कृती पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून थांबवल्या का नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या घटनेतल्या दुसऱ्या बाजूची कृतीही निषेधार्हच आहे. कोणत्याही कारणाने सामान्य माणसांचं नुकसान होणं दुर्दैवी आहे, असंही ठाकरे यांनी सांगितलं.

 

भारतीय जनता पक्ष आणि विश्व हिंदू परिषद, बजरंग दल अशा त्यांच्याशी संलग्न संघटनांनी चिथावणीखोर वक्तव्यं करायचा कार्यक्रमच हाती घेतला असून हे शब्द महाराष्ट्राच्या जनतेला तोडणारे आहेत, असा आरोप ठाकरे यांनी केला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा