नागपूरमध्ये १२ ते १४ जानेवारी दरम्यान राज्यस्तरीय मराठी भाषाप्रेमी शैक्षणिक साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. नूतन भारत विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, विदर्भ साहित्य संघ, नागपूर महानगरपालिका शिक्षण विभाग आणि कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. १२ जानेवारी रोजी संध्याकाळी ६ वाजता कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशीमबाग इथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन होणार आहे. अभिनेते अंकुश चौधरी यांची यावेळी विशेष उपस्थिती राहणार आहे. राज्यस्तरीय मराठी भाषाप्रेमी शैक्षणिक साहित्यचे अध्यक्ष रवींद्र कटोलकर यांनी ही माहिती दिली.
Site Admin | January 8, 2025 7:08 PM | Nagpur