दिव्यांगांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा असून त्यांच्या उदरनिर्वाहाचे प्रश्न सोडवल्यानं आपल्याला समाधान मिळतं, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. नागपूर इथं आधार संस्था आणि वेकोलिच्या संयुक्त विद्यमाने गरजू विद्यार्थ्यांना श्रवणयंत्र वितरित करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. आपण आतापर्यंत ४० हजार दिव्यांगांना उपयोगी पडणारं साहित्य वितरित केलं आहे, ८० दिव्यांगांना कृत्रिम पाय लावून देण्यासाठी मदत केली आहे असं गडकरी यांनी सांगितलं. संपूर्ण विदर्भातल्या दिव्यांगांना दिव्यागांना आवश्यक साहित्य वाटप करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
Site Admin | September 14, 2024 7:44 PM | Nagpur