तान्ह्या पोळ्यानिमित्त नागपुरात आज मारबत आणि बडग्याची मिरवणूक काढण्यात आली. नागपुरातल्या जागनाथ बुधवारी परिसरातून पिवळी मारबत, तर नेहरू पार्क इतवारी इथून काळ्या मारबतीची मिरवणूक निघाली. या मारबत उत्सवाला १४४ वर्षांची परंपरा आहे. वर्षभरातल्या विविध घटना आणि विषयांवर भाष्य करणाऱ्या बडग्यांची देखील मिरवणूक काढली जाते. यंदा चिकुनगुनिया, डेंग्यू, रस्त्यातले खड्डे, महिलांवरचे अत्याचार, भ्रष्टाचार महागाई, वाढती बेरोजगारी विषयांवरच्या बडग्यांनी नागरिकांचं लक्ष वेधलं.
वाशिममधे तान्ह्या पोळ्यानिमित्त पूजेचे बैल घेऊन लहान मुलं सकाळीच घरोघर पोचली. यंदा जिल्ह्यात पोळ्याला दुष्काळाची किनार असली तरी या निरागस बालकांचा तान्हा पोळा मात्र उत्साहात आणि आनंदात साजरा झाला.