नवी दिल्लीतल्या इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रात काल पाचव्या नदी उत्सवाच उद्घाटन करण्यात आल. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात नदीचे विविध पैलू आणि नदीकाठी विकसित झालेल्या संस्कृतीवर प्रकाश टाकण्यात आला आहे . यामध्ये कंसावती नदी आणि तिथली संस्कृति या विषयावर छायाचित्र प्रदर्शन, विविध होडयांच्या प्रतिकृति आणि विद्यार्थ्यानी काढलेल्या नदी विषयक चित्रांच प्रदर्शन आदींचा समावेश आहे. देशात नद्यांविषयी सन्मान , महत्व, विश्वास, जन भावना आणि उत्साह वाढवण हा या नदी उत्सवामगचा उद्देश आहे अस इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राचे सदस्य डॉ सच्चिदानंद जोशी यांनी सांगितल.
Site Admin | September 20, 2024 10:32 AM | Nadi Utsav 2024