म्हैसूरमध्ये 10 दिवस सुरू असलेल्या म्हैसूर दसरा महोत्सवाची सांगता काल विजयादशमीच्या दिवशी भव्य जांबू सावरी म्हणजेच हत्तीच्या मिरवणुकीने झाली. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी, कुंभ लग्नात दसरा हत्ती अभिमन्यूने वाहून नेलेल्या 750 किलो सोन्याच्या हौद्यात विराजमान देवी चामुंडेश्वरीला पुष्पहार अर्पण केला. यानिमित्त 95 हजार दिव्यांनी उजळलेला म्हैसूर राजवाडा आणि नेत्रदीपक ड्रोन प्रदर्शनासह फटाक्यांची आतषबाजी पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. वाईटावर चांगल्याचा विजय असलेला हा दसरा उत्सव 15 व्या शतकात विजयनगरच्या राजांनी प्रथम साजरा केला आणि पुढे म्हैसूरमधील वाडियार राजघराण्याने तो सुरू ठेवला.
Site Admin | October 13, 2024 11:30 AM | dasara | Mahotsav | mysurur