डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

January 4, 2025 6:39 PM | Myanmar

printer

म्यानमार लष्करी सरकारकडून सहा हजार कैद्यांची शिक्षा माफ

म्यानमारच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त तिथल्या लष्करी सरकारनं सहा हजार कैद्यांची शिक्षा माफ केली आहे, यात १८० परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. या सोबतच इतर कैद्यांच्या शिक्षेतही कपात केली गेली आहे. मानवतावादी तत्त्वांवर ही माफी दिल्याचं तिथल्या लष्करानं म्हटलं आहे.

 

मात्र या कैद्यांना कोणत्या गुन्ह्यांबद्दल दोषी ठरवलं गेलं होतं, तसंच त्यातल्या परदेशी नागरिकांच्या नागरिकत्वाबाबत लष्करानं कोणताही खुलासा केलेला नाही.

 

तिथे अजूनही तुरुंगात असलेल्या कैद्यांमध्ये देशाच्या माजी नेत्या, नोबेल पारितोषिक विजेत्या आंग सान स्यू यांचाही समावेश आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा