भारत सरकारतर्फे, म्यानमा मधील भूकंपग्रस्तांना “ऑपरेशन ब्रह्मा’ अंतर्गत मदत पुरवण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून भारतीय वैद्यकीय पथकानं स्थापन केलेल्या आर्मी फील्ड रुग्णालयात 104 रुग्णांवर उपचार करण्यात आले तर दोन मोठ्या शास्त्रक्रियादेखील करण्यात आल्या असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.
16 टन मानविय मदत आणि आपत्ति निवारण साहित्य घेऊन जाणारं भारतीय हवाई दलाचं एक विमान काल दुपारी 2 वाजता म्यानमामधील मंडाले विमानतळावर पोहोचलं. मदतीसाठी मंडाले इथं उतरणारं हे पहिलंच विमान होतं.