डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

म्यानमांमधल्या भूकंपात दगावलेल्यांची संख्या सतराशेवर

म्यानमांमधल्या भूकंपात दगावलेल्यांची संख्या सतराशेवर पोचली आहे. संसाधनांच्या कमतरतेमुळे आणि संपर्क  तुटल्यामुळे बचावपथकाला हाताने ढिगारे उपसावे लागत आहेत.  दरम्यान म्यानमांला आज पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का बसला. ५ पूर्णांक १ दशांश रिश्टर स्केल तीव्रतेचा या भूकंपाचे केंद्र मंडाले या दुसऱ्या मुख्य शहराजवळ होते. या भूकंपात झालेल्या हानीबद्दल काहीही वृत्त अद्याप आलेलं नाही. 

 

या नैसर्गीक आपत्तीदरम्यानही म्यानमांच्या जुंटा बंडखोरांनी बाँबहल्ले सुरुच ठेवले आहेत. संयुक्त राष्ट्रांनी या हल्ल्यांना संपूर्णपणे निषेधार्ह म्हटलं आहे. विस्थापित नॅशनल युनिटी सरकारने मात्र भूकंपग्रस्त भागातल्या लष्करी कारवाईला दोन आठवडे स्थगिती दिली आहे. 

 

थायलंडमध्ये मध्येही भूकंपग्रस्त भागात बचावकार्य सुरु आहे. भूकंपात  दगावलेल्यांचा आकडा सतरावर पोचला असून त्र्याऐंशीजण अजून बेपत्ता आहेत. दरम्यान दुर्घटनाग्रस्त भागात वैद्यकीय कीटची तीव्र टंचाई असल्याचं संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा