नवोन्मेष, समावेशकता, शाश्वतता आणि विश्वास हाच तंत्रज्ञानाधिष्ठित प्रशासनाचा गाभा असल्याचं प्रतिपादन दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी केलं आहे. स्पेनमध्ये बार्सिलोना इथं झालेल्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये ते बोलत होते. स्पेक्ट्रम व्यवस्थापन, बाजारातलं स्थैर्य सुनिश्चित करणं, देशातंर्गत विविध प्रक्रिया सुलभ करण्यासाठी दूरसंचार नियमन सुरू करणं आणि सायबर सुरक्षेसाठी उपाययोजना अशा विविध पद्धतीनं भारत तंत्रज्ञानाधिष्ठित प्रशासनाच्या दिशेने पुढे जात असल्याचं ते म्हणाले. या कार्यक्रमात शिंदे यांनी इंडिया मोबाइल काँग्रेस दालन आणि भारत पॅव्हेलियनचं अनावरण केलं. या दालनात ३८ भारतीय दूरसंचार उपकरणांचं प्रदर्शन करण्यात आलं आहे.
Site Admin | March 5, 2025 1:16 PM | MWC2025 | Spain
नवोन्मेष, समावेशकता, शाश्वतता आणि विश्वास हाच तंत्रज्ञानाधिष्ठित प्रशासनाचा गाभा – मंत्री ज्योतिरादित्य शिंदे
