महाविकास आघाडी म्हणून आम्ही तीन पक्ष आणि इतर काही सामाजिक संघटनांसह छोटे पक्ष मिळून आगामी विधानसभा निवडणूक एकत्रित आणि अधिक ताकदीने लढणार असल्याची घोषणा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर केले. धार्मिक ध्रुवीकरणाचा निवडणुकीत काहीही परिणाम झाला नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
महाविकास आघाडीनं आज मुंबईत संयुक्त परिषद देऊन लोकसभा निवडणुकीत ४८ पैकी ३० जागा निवडून दिल्याबद्दल राज्यातल्या मतदारांचे आभार मानले आहेत. मदत करणारे छोटे-मोठे पक्ष, काही संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते यांचेही त्यांनी आभार मानले आहेत.
दरम्यान काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. प्रत्येक पक्ष मुख्यमंत्रीपदावर दावा करत आहे. यावरुन मविआची बांधिलकीही जनतेच्या प्रश्नांशी नसून सत्तेच्या खुर्चीसाठी असल्याची टीका शिवसेना सचिव माजी आमदार किरण पावसकर यांनी केली आहे.