अमेरिकेत नुकारापु साई तेजा या भारतीय विद्यार्थ्याचा खून झाल्याबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस. जयशंकर यांनी दुःख व्यक्त केलं आहे. या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना शिकागोमधील भारतीय दूतावासाद्वारे सर्व शक्यती मदत केली जात असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरील एका संदेशात म्हटलं आहे. या विद्यार्थ्याचा खून करणाऱ्या लोकांविरुद्ध तत्काळ कारवाई करण्याची मागणी शिकागोमधील भारतीय दूतावासानं केली आहे.