मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या वैतरणा धरणातून पाणी वाहून नेणाऱ्या जलवाहिनीच्या यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे आज १७ आणि उद्या १८ ऑक्टोबर रोजी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सर्व ठिकाणी ५ ते १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. जलवाहिनीच्या यंत्रणेचं दुरुस्तीचं काम युद्ध पातळीवर सुरु असून, या काळात नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा असं आवाहन महानगरपालिका प्रशासनानं केलं आहे.
Site Admin | October 17, 2024 7:49 PM | Mumbai | Water Supply