राजभवनातर्फे आयोजित २६व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवात मुंबई विद्यापीठानं ४३० गुणांची कमाई करत सर्वसाधारण विजेतेपद पटकावलं. पुरुष गटात २०० गुण आणि महिला गटात २३० गुण मिळवून मुंबई विद्यापीठानं हा बहुमान मिळवला. गडचिरोलीतल्या गोंडवाना विद्यापीठात १८ ते २२ फेब्रुवारी दरम्यान हा महोत्सव झाला. विविध स्पर्धा प्रकारात मुंबई विद्यापीठानं ५ सुवर्ण ६ रौप्य आणि ३ कांस्य पदकांची कमाई केली. मुंबई विद्यापीठाच्या मुलींच्या संघानं खोखो, टेबल टेनिस, कबड्डी यात तर मुलांनी बॅडमिंटन आणि बुद्धिबळ प्रकारात अव्वल स्थान पटकावलं.
Site Admin | February 23, 2025 5:06 PM | mumbai university | SPORTS
मुंबई विद्यापीठानं २६व्या क्रीडा महोत्सवात ४३० गुणांसह पटकावलं विजेतेपद
