मुंबई विद्यापीठानं उन्हाळी सत्राच्या विविध विद्याशाखेअंतर्गत होणाऱ्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. मार्चमध्ये या परीक्षांना सुरुवात होईल. या परीक्षांना १ लाख ३८ हजार विद्यार्थी बसणार असून त्याकरता ४३९ परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. संबंधित विद्यार्थ्यांचे विषय, आसन क्रमांक आणि अनुषंगिक तपशीलाबाबतची तात्पुरती प्रवेशपत्रं महाविद्यालयांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत, असं विद्यापीठानं कळवलं आहे.
Site Admin | January 1, 2025 3:19 PM | Exam | mumbai university