डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

March 16, 2025 3:09 PM | mumbai university

printer

मुंबई विद्यापीठात महिला कर्तृत्वाच्या सन्मान सोहळ्याचं आयोजन

मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या महिला पदवीधर आणि  भारतातल्या पहिल्या महिला वकील कॉर्नेलिया सोरोबजी यांच्या वकिलीच्या शताब्दी वर्षानिमित्त तसंच विविध क्षेत्रांतल्या महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी काल मुंबई विद्यापीठात महिला कर्तृत्वाचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. याशिवाय ‘ब्रेकिंग ग्लास सिलिंगः वुमन हू मेड इट’ या विषयावर राष्ट्रीय परिसंवादही आयोजित केला होता.

 

परिसंवादाचं उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना यांच्या हस्ते झालं. राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव सुजाता सौनिक या कार्यक्रमाच्या सन्माननीय अतिथी होत्या. पद्मश्री राहीबाई पोपेरे, यांच्यासह विविध क्षेत्रातल्य कर्तृत्ववान महिला यावेळी उपस्थित होत्या.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा