मुंबईत टोरेस या परदेशी कंपनीने गुंतवणूकदारांची जवळपास १३ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी या कंपनीच्या ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुंतवणूकदारांना १० टक्के परतावा देण्याचं आमिष दाखवून या कंपनीनं अनेकांकडून पैसे गोळा केले आणि त्यानंतर गाशा गुंडाळला. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच गुंतवणूकदारांनी कंपनीच्या दादर इथल्या बंद कार्यालयासमोर आंदोलन केलं.
Site Admin | January 7, 2025 7:58 PM | Torres Company
टोरेस परदेशी कंपनीनं गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
