सव्वीस अकराच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिस अधिकारी आणि जवानांचा आज सोळावा स्मृतीदिन. मुंबई पोलिस मुख्यालयात, राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी या हल्ल्यातल्या हुतात्म्यांना पुष्पचक्र वाहून आदरांजली व्यक्त केली. हुतात्म्यांचे कुटुंबीय आणि उपस्थित आजी-माजी पोलिस अधिकाऱ्यांची भेट राज्यपालांनी यावेळी घेतली. यावेळी उपस्थित इतर मान्यवर, पोलीस अधिकारी आणि जवानांनी हुतात्म्यांना अभिवादन केलं.
Site Admin | November 26, 2024 1:40 PM | Mumbai Terror Attack