डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

टँकरचालकांच्या संपामुळे मुंबईत आपत्कालीन कायदा लागू

केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नवीन नियमावली विरोधात मुंबईतल्या टँकर चालकांचा संप सुरुच असल्यानं, मुंबई महानगरपालिका प्रशासनानं २००५ चा आपत्कालीन व्यवस्थापन कायदा लागू करायचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत पालिकेच्या वतीनं शहरातल्या सर्व विहिरी, कूपनलिका आणि खासगी पाणीपुरवठा करणारे टँकर्स अधिग्रहित केल्या जाणार आहेत. व्यापक जनहितासाठी हा निर्णय घेतल्याचं पालिकेनं म्हटलं आहे. या निर्णयामुळे आता खासगी गृहनिर्माण संस्था आणि इतरांना टँकरद्वारे सुरळीतपणे पाणीपुरवठा करणं शक्य होईल असं पालिकेनं म्हटलं आहे.

 

केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नवीन नियमावलीनुसार पालिकेनं  विहीर आणि कूपनलिका धारकांना ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी नोटीस बजावली होती, मात्र त्यामुळे ट्रँकर चालकांना पाणी मिळवण्यात अडचण येऊ लागली होती. याविरोधात त्यांनी हा संप सुरु केला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर पाटील यांनी या नोटिसांना स्थगिती द्यायचे निर्देश दिले होते. मात्र यानंतरही टँकर चालकांनी अद्याप संप मागे घेतलेला नाही. 

 

दरम्यान मुंबईतल्या नागरिकांना उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय भूजल प्राधिकरणाचे नियम आणि टँकर चालकांच्या मागण्यांवर तातडीने तोडगा काढायची सूचना महानगर पालिकेला केली आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा