रिझर्व बँकेने व्याज दर कायम ठेवल्याचा परिणाम शेअर बाजारावर दिसून आला. सकाळी नफेखोरीमुळे बाजाराची वाटचाल मंद होती. पण हा निर्णय जाहीर होताच तासाभरात खरेदीचा ओघ वाढल्याने मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३६९ अंकानी वाढून ८२ हजार ००४ पर्यंत पोचला. तसंच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही १३३ अंकांनी वाढून २५ हजार १४७ अंकावर पोचला.
Site Admin | October 9, 2024 2:35 PM | Mumbai Share Market