शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज २ हजार २२३ अंकांनी घसरून ७८ हजार ७५९ अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ६६२ अंकांची घसरण नोंदवत २४ हजार ५६ अंकांवर बंद झाला. जपानचा शेअर बाजार निक्केई कोलमडल्यानं संपूर्ण जगभरातल्या शेअर बाजारात आज घसरण पाहायला मिळाली. याचा सर्वाधिक प्रभाव आशियातल्या शेअर बाजारांवर दिसून आला. बाजारातली पडझड रोखण्यासाठी दक्षिण कोरियानं २० मिनिटं व्यवहार बंद केले होते. चीन आणि हाँगकाँग यांच्या शेअर बाजारांवर मात्र या पडझडीचा परिणाम दिसून आलास नाही.
Site Admin | August 5, 2024 7:30 PM | Mumbai Stock Market