मुंबईच्या वडाळा इथून पोलिसांनी काल एक कोटी ११ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे चेंडू जप्त केले. याप्रकरणी पोलिसांनी एका इलेक्ट्रिशियनला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडाळा परिसरात एका व्यक्तीच्या हालचाली संशायस्पद वाटल्यानं त्याला ताब्यात घेतलं. त्याची कसून चौकशी केली असता त्याच्याकडे सुमारे दीड किलो वजनाचे सोन्याची पावडर असलेले चेंडू सापडले. याची किंमत एक कोटी ११ लाख रुपये इतकी आहे. हे चेंडू त्याला डोंगरीतील एका व्यक्तीनं अंधेरीत राहणाऱ्या एका व्यक्तीकडे पोहोचवण्यास सांगितलं होतं.पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.