डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

मुंबई महानगरात पोलिसांना पुरेशा सदनिकांसाठी तातडीने प्रस्ताव तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई महानगरात पोलिसांना पुरेशा सदनिकांसाठी तातडीने प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासमवेत मुख्यमंत्र्यांची आज वर्षा निवासस्थानी बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर उपाययोजना करण्याचं आश्वासन दिलं. वरळी इथल्या पोलीस वसाहतीच्या समस्याही तत्काळ दूर करण्यासाठी आठ दिवसांच्या आत कार्यवाही करावी, अशी सूचना त्यांनी केली.

बीडीडी चाळ पुनर्विकसित इमारतीत दुकानदारांना वाढीव जागा कशी देता येईल याबाबत नव्या इमारतींच्या आराखड्याचा विचार करून तसा प्रस्ताव तयार करावा, नव्या पुनर्विकसित इमारतींमध्ये ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य द्यावं असंही त्यांनी म्हाडाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सांगितलं. कल्याण ते शिळ रस्त्यावर पलावा समोरचा पूल आणि कल्याण इथला पत्री पुल या जोड रस्त्यांचं कामही तातडीनं हाती घ्यावं, असे निर्देश त्यांनी दिले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा