नागरिकांसाठी आरोग्य सेवा आणखी सुलभ पद्धतीनं उपलब्ध करून देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका अद्ययावत आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणालीचा वापर करणार आहे. आरोग्य विभाग एकंदर चार टप्प्यांमध्ये या प्रणालीची अंमलबजावणी केली जाईल. नागरिकांना आरोग्य सुविधांसाठी वाट बघावी लागू नये आणि त्यांना सोप्या आणि डिजिटल पद्धतीनं वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी, हा यामागचा उद्देश आहे.
Site Admin | August 30, 2024 6:40 PM | BMC
मुंबई मनपा आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणालीचा वापर करणार
