गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आगमन आणि विसर्जनासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज झाली आहे. चौपाटयांसह गणेश विसर्जन स्थळे, कृत्रिम तलाव या ठिकाणी पालिकेच्या वतीने सर्व सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. यंदा ६९ नैसर्गिक स्थळांबरोबरच २०४ कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. याशिवाय विभाग स्तरावर फिरती विसर्जन स्थळे, तसेच गणेश मूर्ती संकलन केंद्रे आदी सुविधा पुरविण्यात आल्या असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली
Site Admin | September 5, 2024 3:45 PM | BMC | Ganeshotsav
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका सज्ज
