मुंबईत बाणगंगा तलाव परिसरात दुरुस्तीदरम्यान पायऱ्यांचं नुकसान झाल्यासंदर्भात कंत्राटदाराविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुंबई महापालिकेनं दिले आहेत. ऐतिहासिक बाणगंगा तलाव आणि परिसरातल्या पुनरूज्जीवन कामांची पाहणी आयुक्त भूषण गगराणी यांनी आज केली. यावेळी पुरातत्त्व विभागाच्या सूचनेनुसार उर्वरित टप्प्यातली कामं पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसंच तलावातला गाळ काढण्याची सूचनाही त्यांनी दिली.
Site Admin | June 27, 2024 6:21 PM | बाणगंगा तलाव | भूषण गगराणी | मुंबई महापालिका
बाणगंगा तलाव परिसरात नुकसान करणाऱ्या कंत्राटदाराविरोधात कडक कारवाई करण्याचे मुंबई महापालिकेचे निर्देश
