मुंबई मराठी साहित्य संघाचे ‘नाट्यगौरव सन्मान’ जाहीर झाले आहेत. यामध्ये चतुरस्त्र रंगकर्मी पुरूषोत्तम बेर्डे, लेखिका अभिनेत्री डॉ. श्वेता पेंडसे, संगीत नाटकांचे लेखक प्रदीप ओक, ख्यातनाम प्रकाश योजनाकार श्याम चव्हाण, संगीत रंगभूमीवरील नवोदित कलाकार भाग्येश मराठे, डॉ गौरी पंडित, तबलावादक आदित्य पानवलकर, अस्तित्वचे लेखक-दिग्दर्शक स्वप्नील जाधव, आनंद पालव, संतोष भुवड आदी मान्यवरांचा सन्मान होणार आहे. संस्थेचे संस्थापक डॉ. अ. ना. भालेराव यांच्या स्मृतिदिना निमित्त, अध्यक्ष अचला जोशी आणि ज्येष्ठ नटवर्य बाळ धुरी यांच्या हस्ते येत्या २५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी सन्मानितांना गौरवण्यात येणार असल्याचं नाट्यशाखेचे कार्यवाह प्रमोद पवार यांनी केलं आहे.
Site Admin | August 17, 2024 2:54 PM | Maharashtra | marathi | Naty Gaurav Samman
मुंबई मराठी साहित्य संघाचे ‘नाट्यगौरव सन्मान’ जाहीर
