डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

मुंबई इंडियन्स संघाचा कोलकाता नाइट रायडर्सवर दणदणीत विजय

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघानं कोलकाता नाइट रायडर्सवर 8 गडी आणि 43 चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला.
त्यापूर्वी मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. आणि कोलकाता नाइट रायडर्स संघाला 17 व्या षटकात ११६ धावांवर सर्वबाद केलं. 117 धावांच हे लक्ष्य मुंबईने केवळ दोन गड्याच्या मोबदल्यात १3व्या षटकातच पूर्ण केल. रायन रुकेलटन यांनं ४१ चेंडूत ६२ धावा तर सुर्यकुमार यादवनं ९ चेंडूत २७ धावा करत विजयी भागिदारी केली. आज लखनौ सुपर जायंडटसचा सामना पंजाब किंग्जबरोबर लखनौ इथं खेळाला जाईल.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा