मुंबईतल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांसाठीची परवानगी पत्रे ६ ऑगस्टपासून दिली जाणार आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रसिद्धी पत्रकात ही माहिती देण्यात आली असून गणेश मंडळे महानगनपालिकेच्या यासाठी तयार करण्यात आलेल्या पोर्टवर जाऊन त्याची प्रक्रिया पूर्ण करु शकतील. ज्या मंडळांनी गेल्या दहा वर्षात परवानगीच्या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. त्यांना पुढील ५ वर्षांसाठी परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती महानगरपालिकेनं प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात दिली आहे. त्यांना दरवर्षी त्यांच्या परवान्याचं नुतनीकरण करावं लागणार आहे. ७ सप्टेंबर पासून गणेशोत्सव सुरु होत आहे. यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सवावर भर देण्यात आला असून महानगरपालिकेनं ५०० टन शाडूची माती पूरवली आहे.