मुंबईत वरळी वांद्रे सी लिंक ला मरीन ड्राईव्ह कडून येणारा रस्ता जोडणाऱ्या किनारी मार्ग प्रकल्पातल्या टप्प्याचं लोकार्पण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच मंत्री दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा यावेळी उपस्थित होते. या सागरी किनारा मार्गामुळे मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हा पाऊण तासाचा रस्ता केवळ १० मिनिटात पार करता येईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. आपल्या सरकारने राजधानी मुंबईला नेहमीच प्राधान्य दिलं असून मुंबईकरांना रस्ते आणि इतर सुविधा देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. किनारी मार्गाच्या बांधकामाचा अडथळा मच्छिमारीत येऊ नये याकरता रचनेत बदल केला असल्याचं त्यांनी सांगितलं.
Site Admin | September 12, 2024 7:00 PM | Mumbai Coastal Road
वरळी वांद्रे सी लिंकला मरीन ड्राईव्हकडून येणारा रस्ता जोडणाऱ्या किनारी मार्ग प्रकल्पातल्या टप्प्याचं लोकार्पण
