डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

December 21, 2024 8:16 PM | Mumbai Boat Capsized

printer

प्रवासी बोटीला झालेल्या अपघातातल्या मृतांची संख्या १५ वर

मुंबईत गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटा गुंफांच्या दिशेनं जाणाऱ्या प्रवासी बोटीला १८ डिसेंबर रोजी झालेल्या अपघातातल्या मृतांची संख्या १५ झाली आहे. या दुर्घटनेत बेपत्ता असलेल्या एका सात वर्षांच्या मुलाचा मृतदेह आज दुपारी बचाव पथकाला सापडला. या मुलाच्या आईचाही या अपघातात मृत्यू झाला होता. भारतीय नौदलाची बोट अनियंत्रित होऊन प्रवासी बोटीला धडकल्याने झालेल्या या अपघातात दोन्ही बोटींमधल्या एकंदर ११३ प्रवाशांपैकी ९८ जणांना वाचवण्यात यश आलं होतं. १३ जण अपघाताच्या दिवशीच मृत्युमुखी पडले, तर दोन जण बेपत्ता होते. त्यापैकी एकाचा मृतदेह गुरुवारी सापडला होता.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा