गेटवे ऑफ इंडियापासून घारापुरीला जाणारी बोट उलटून काल झालेल्या अपघातात मृतांची संख्या तेरा झाली असून बेपत्ता असलेल्या दोघांचा शोध सुरु आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांना दोन लाख तर जखमींना पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबांना पाच लाख रुपये मदत जाहीर केली आहे. नौदलाची चार हेलीकॉप्टर्स, तटरक्षक दलाची बोट आणि तीन सागरी पोलीस दलाच्या बोटींनी बचावकार्यात भाग घेतला. जखमी झालेल्या एकशेपाच जणांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
नौदलाच्या बोटीच्या इंजिनाचं परिक्षण सुरु असताना इंजिनावरचा ताबा सुटल्यामुळे या बोटीची धडक प्रवासी बोटीला बसल्याचं स्पष्टीकरण नौदलानं दिलं आहे. मृतांमध्ये तीन नौदल कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.