उरण इथे काल झालेल्या बोट अपघाताचा तपास करण्यासाठी भारतीय नौदलाने विशेष चौकशी समितीची स्थापना केली आहे. गेटवे ऑफ इंडियावरून काल एलिफंटाला निघालेल्या बोटीला उरण इथे अपघात झाला आणि त्यात १३ जण मृत्युमुखी पडले. यात नौदलाचे चार कर्मचारी आणि ९ प्रवाशांचा समावेश आहे. नौदलाचे दोन कर्मचारी अद्यापही बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे. अपघातातल्या जखमींवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
Site Admin | December 19, 2024 7:22 PM | Mumbai Boat Capsized