मुंबईत काल झालेल्या बोट दुर्घटनेप्रकरणी काँग्रेसचे नाना पटोले यांनी आज विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही यावर चर्चा करण्याची तयारी दर्शवली. या घटनेबद्दल सरकारने आजचं कामकाज संपेपर्यंत निवेदन द्यावं, त्यानंतर चर्चा घेण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. बीड जिल्ह्यातल्या माजी सरपंचांची हत्या आणि परभणीतल्या हिंसाचाराच्या मुद्यावर विधानसभेत चर्चा आज पुन्हा सुरू झाली. सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या चर्चेला उत्तर देत आहेत.
Site Admin | December 19, 2024 3:34 PM | Nana Patole