बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात उघड्यावर कचरा जाळणाऱ्यांना यापुढं १०० रुपयांऐवजी एक हजार रुपये इतका दंड आकारला जाणार असल्याचं महानगरपालिकेनं स्पष्ट केलं आहे. येत्या १ एप्रिलपासून याची अंमलबजावणी होणार आहे. उघड्यावर कचरा जाळल्यामुळे वायू प्रदूषण तसंच पर्यावरण विषयक गंभीर धोके निर्माण होत असल्याची जाणीव करून देण्यासाठी महानगरपालिकेनं दंडाच्या रकमेत दहा पटींनी वाढ केली आहे.
Site Admin | March 28, 2025 9:12 PM | BMC | Mumbai
सावधान ! उघड्यावर कचरा जाळल्यास बसणार दंड
