मुंबई महानगर क्षेत्रातली हवेची खालावलेली गुणवत्ता लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेनं तातडीच्या अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना लागू केल्या आहेत. त्यानुसार, रस्त्यांवर चर खोदण्याच्या कामाला तात्काळ प्रभावानं मनाई करण्यात आली आहे. ही मनाई पुढील आदेश येईपर्यंत लागू असेल. पाणी पुरवठ्याच्या मुख्य जलवाहिनी गळतीच्या कामकाजाचा अपवाद वगळता, नवीन चर खोदण्याच्या परवानग्या दिल्या जाणार नाहीत, असं महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी स्पष्ट केलं आहे.
Site Admin | December 31, 2024 8:05 PM | BMC | Mumbai
हवेच्या खालावलेल्या गुणवत्तेच्या पार्श्वभूमीवर मुंबई पालिकेच्या उपाययोजना
