मुंबई विमानतळावर सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी दोन प्रवाशांकडून ९ कोटी ५३ लाख रुपयांचा गांजा आणि ५८ लाख ८३ हजार रुपये किमतीचं सोनं जप्त केलं. याप्रकरणी एका प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. एक प्रवासी बँकॉकहून इंडिगो एअरलाइन्सच्या विमानानं मुंबईला तर दुसरा इंडिगो एअरलाइन्सच्या विमानानं दुबईहून मुंबईला आला होता.