मुंबई शहरातलं वायू प्रदूषणाचं प्रमाण पूर्ण नियंत्रणात येत नाही तोपर्यंत ई विभागातल्या बांधकाम प्रकल्पांवरचे निर्बंध कायम ठेवण्यात येणार असल्याचं महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागानं एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलं आहे. भायखळा परिसरात सुरु असलेल्या बांधकाम प्रकल्पांची पाहणी केल्यानंतर महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी हे निर्देश दिल्याचं पत्रकात म्हटलं आहे.
Site Admin | January 1, 2025 8:01 PM | Air Pollution | Mumbai