पुण्यात राबवण्यात येणाऱ्या मुळा-मुठा नदीसुधार प्रकल्पासाठी राज्य पर्यावरण प्रभाव मुल्यांकन प्राधिकरणने २०१९ मध्ये दिलेल्या ना हरकत प्रमाणपत्रावर आक्षेप घेणारी याचिका राष्ट्रीय हरित लवादाने निकाली काढली आहे. त्यामुळे या प्रकल्पा अंतर्गत करण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या कामांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मुळा-मुठा नदीसुधार प्रकल्पामुळे वृक्षतोड केली जाईल, नदीची वहन क्षमता कमी होईल, पूरस्थिती निर्माण होईल असे आक्षेप घेत पर्यावरण अभ्यासक सारंग यादवडकर यांनी २०२३ मध्ये ही याचिका दाखल केली होती.
Site Admin | September 20, 2024 9:00 AM | Pune