राज्यातल्या शेवटच्या बहिणीचा अर्ज सादर होईपर्यंत योजनेसाठी नोंदणी सुरूच राहील, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. यवतमाळ इथं लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ती मेळाव्यात ते बोलत होते. या योजनेसाठी आतापर्यंत एक कोटी ४० लाख महिलांनी नोंदणी केली असून एक कोटी सात लाख लाभार्थ्यांच्या खात्यात योजनेची रक्कम जमा झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पुढच्या महिन्यात अर्ज सादर करणाऱ्यांनाही ३ महिन्याचे पैसे देणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर या योजनेमुळे चांद्यापासून बांद्यापर्यंत महिला समाधानी असून निकषात बसणारी एकही महिला यापासून वंचित राहणार नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले.
Site Admin | August 24, 2024 7:13 PM | CM Eknath Shinde | Mukhyamantri Lakdi Bahin Yojana
शेवटच्या महिलेचा अर्ज येईपर्यंत लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी सुरू राहणार असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही
