राज्यातल्या तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळावा तसंच तरुणांमधल्या कल्पकता आणि तंत्रज्ञानकुशलतेचा उपयोग प्रशासनाला व्हावा म्हणून राज्यातल्या पदवीधर तरुणांसाठी “मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम” २०२५-२६ जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमात ६० फेलोंची निवड एक वर्षासाठी होणार असून यातल्या २० जागा महिला उमेदवारांसाठी राखीव असतील. निवड झालेल्या फेलोंसाठी मुंबई आयआयटीच्या सहकार्यातून ‘स्वतंत्र सार्वजनिक धोरण’ या विषयातील पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम आयोजित केला जाईल. अधिक माहितीसाठी शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या mahades.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
Site Admin | April 5, 2025 6:25 PM | CM Fellowship
राज्यातल्या पदवीधर तरुणांसाठी “मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम” जाहीर
